Tuesday , March 3 2026
Breaking News

एपीएमसी पोलिसांकडून चोरट्याला अटक : दोन लाखाचे मंगळसूत्र जप्त

Spread the love

 

बेळगाव : महिलेला लुटणाऱ्या चोरट्याला एपीएमसी पोलिसांनी चोवीस तासांत अटक करून चोरीचे मंगळसूत्र जप्त केले.
16 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वाजता एपीएमसी जवळ पायी चालत जाणाऱ्या प्रीती नार्वेकर नावाच्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतल्याप्रकरणी एका व्यक्तीवर एपीएमसी ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणाचा तपास करून एपीएमसी पोलिसांनी आरोपीचा शोध घेत सोमेश लक्ष्मण शंभूचे (वय 37, रा. कंग्राळ गल्ली, बेळगाव) याला अटक केली. त्याच्याकडून चौकशीअंती 2,12,400 रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले. या प्रकरणी आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून प्रकरणाचा तपास सुरू ठेवण्यात आला आहे. पोलिस आयुक्त आणि डीसीपी यांनी आरोपी शोधून प्रकरण उघडकीस आणणाऱ्या एपीएमसी पीआय आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *