चिक्कोडी : कुडची शहराजवळील कृष्णा नदी पात्रातील पाणी पातळीची मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्थानिक नेते आणि विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी केली.
गेल्या आठवड्याभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे महाराष्ट्र सरकारने कोयना जलाशयातून कृष्णा नदी पात्रात पाणी सोडण्यासाठी कर्नाटक सरकारने महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना पात्र पाठवले होते. या मागणीला प्रतिसाद देत महाराष्ट्र सरकारने कृष्णा नदीत पाणी सोडण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच कोयना धरणातून कृष्णा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. यासंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. दरम्यान या पार्श्वभूमीवर आज सार्वजनिक बांधकाम तथा बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी कुडची शहराजवळील कृष्णा नदी पात्रातील पाणी पातळीची पाहणी केली. यावेळी स्थानिक नेते, अधिकारी उपस्थित होते.