बेळगाव : गोकाकचे माजी आमदार चंद्रशेखर तमन्ना गुड्डाकायू (९२) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. गोकाकचे माजी आमदार चंद्रशेखर तमन्ना गुड्डाकायू (९२) यांचे आज बेळगाव येथील महांतेशनगर येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, उत्तरचे आमदार आसिफ सेठ व इतर मान्यवरांनी त्यांच्या महंतेशनगर येथील निवासस्थानी जाऊन अंतिम दर्शन घेतले. नंतर सदाशिवनगर येथील रुद्रभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
माजी आमदार चंद्रशेखर तमन्ना गुड्डाकायू यांच्या पश्चात चार मुली, दोन मुलगे आणि नातवंडे असा परिवार आहे. बागलकोट वाल्मिकी गुरुपीठाचे प्रसन्नानंद स्वामीजी, माजी नगरसेविका पुष्पा पर्वतराव यांच्यासह अनेक मान्यवर अंत्यसंस्काराला उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta