Sunday , July 26 2026
Breaking News

अथणी औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात बॉयलरचा स्फोट; दोन महिला ठार

Spread the love

 

अथणी : कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत दोन महिला ठार तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. बेळगाव जिल्ह्याच्या अथणी तालुक्यातील चिक्कट्टी गावाच्या हद्दीत अथणी लघु औद्योगिक वसाहतीत एका कारखान्यात ही दुर्घटना घडली. सुनंदा तेली या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर शोभा तेली हिला रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, अथणी लघु औद्योगिक वसाहतीतील प्रिया एक्सपोर्ट इंडस्ट्रियल युनिटमध्ये बॉयलरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत सुनंदा सिद्धप्पा तेली हिचा जागीच मृत्यू झाला तर शोभा तेली (वय ३६ रा. सत्ती) हिचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. तर अन्य दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अथणी सरकारी रुग्णालय व महाराष्ट्राच्या मिरज येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्फोटाच्या तीव्रतेने कारखान्याच्या भिंतींनाही तडे गेले. त्यामुळे औद्योगिक वसाहत परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेची नोंद अथणी पोलिस स्थानकात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *