बेळगाव : प्रेमप्रकरणातून किणये येथील तरुणीच्या घरावर दगडफेक करणाऱ्या तरुणाला बेळगाव ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजले.
यासंदर्भात बोलताना पोलीस आयुक्त इडा मार्टिन म्हणाले की, किणये गाबतीलक एका तरुणीच्या घरावर दगडफेक करून त्रास देणाऱ्या तिप्पण्णा डुकरे याला किणये गावातून अटक करण्यात आली आहे.
बेळगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तरुणीच्या कुटुंबीयांना संरक्षणाची हमी देण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta