बेळगाव (वार्ता) : भारतीय गुरुकुल ज्युनिअर कॉलेज (बेळगुंदी क्रॉस) मध्ये नुकताच भारतीय गुरुकुल शिक्षण संस्थेच्यावतीने सुप्रसिद्ध वकील अॅड. सुधीर चव्हाण व अॅड. सचिन शिवनावर यांची बार असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने हृद्य असा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग नाईक उपस्थित होते.
कॉलेजचे प्राचार्य आनंद आपटेकर यांनी प्रास्ताविक करुन कार्याचा गौरव केला. या संस्थेच्या स्थापनेपासून कायदेशीर सल्लागार म्हणून अॅड. सुधीर चव्हाण कार्यरत आहेत. याचा सार्थ अभिमान संस्था पदाधिकार्यांना आहे. त्यांचे योगदान कॉलेजसाठी महत्वाचे आहे. या सत्कार सोहळ्यातून त्यांना भविष्यात अधिक सामाजिक कार्यात बळ मिळो. अशा शुभेच्छा दिल्या. बार असोसिएशनचे उपाध्यक्ष हे मोठं पद आहे. कॉलेजतर्फे प्राचार्य आनंद आपटेकर व वाय. पी. नाईक यांच्या हस्ते पुष्पहार, शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी आपल्या मनोगतात अॅड. चव्हाण यांनी कृतज्ञता व्यक्त करुन, भान ठेवून कार्य करावे लागते. समाजहिताठीच विधायक उपक्रम राबविणे आवश्यक असते. युवकांना योग्य दिशा देणारं शिक्षण असावे, असे मौलिक विचार व्यक्त केले.
यावेळी वाय. पी. नाईक यांनीही त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. अशा सत्कारातून इतरांना प्रेरणा मिळते. संयम, शिस्त, आदराची भावना वाढीस लागते. वकील पेशा हा संविधानाचा आदर करणारा असतो. भेदभाव न करता एकात्मतेचे दर्शन घडवणारी ही व्यक्तिमत्त्व समाजात आदर्शवत वाटतात असे प्रशंसोद्गगार व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर पांडुरंग नाईक, प्राचार्य आनंद आपटेकर, मनोहर प. मोरे, नितीन राजगोळकर, नागेश कोरे, आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. स्मीता गोडसे, सी. जी. अग्नीहोत्री, प्रा. मनीषा आपटेकर, वाय. पी. नाईक, तसेच विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.
सूत्रसंचालन मनोहर मोरे यांनी तर आभार प्रसाद रा. जाधव यांनी मानले.
Check Also
पंचमसाली आरक्षणासाठी १८ रोजी ‘चलो बेंगळुरू’ची हाक : बसवजय मृत्युंजय स्वामी
Spread the love बेळगाव : गेल्या वर्षभरापासून पंचमसाली समाजाचे २ए आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरु …