बेळगाव : 1986 मध्ये झालेल्या कन्नड सक्ती आंदोलनप्रसंगी पोलिसांच्या गोळीबारात 6 जून रोजी बेळगुंदी येथील मारुती गावडा, भावकु चव्हाण व कल्लाप्पा उचगावकर या तिघा तरुणांनी हौतात्म्य पत्करले होते. सालाबादप्रमाणे बेळगुंदीवासीय आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी संयुक्तिकरित्या अभिवादन केले. बेळगुंदी येथील हुतात्मा स्मारकाला पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटे मौन पाळून अभिवादन करण्यात आले.
आज 6 जून रोजी बेळगुंदीवासिय तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काही जागरूक कार्यकर्त्यांतर्फे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
माजी जिल्हा पंचायत सदस्य शिवाजी शिंदे, माजी महापौर शिवाजी सुंठकर, मनोज पावशे, अशोक पाटील, पुंडलिक पावशे, राजू किणेकर, पीएलडी बँकेचे व्हा. चेअरमन परशराम पाटील, मारुती शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, माजी नगरसेवक दिलीप बैलूरकर, माजी नगरसेवक अनिल पाटील, राजकुमार बोकडे, रविकिरण को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक मंडळ यावेळी उपस्थित होते.