बेळगाव : मच्छे (तालुका बेळगाव) येथे शिवराज्याभिषेक दिन विविध उपक्रमाद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला.
छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या महिलांच्या हस्ते करण्यात आले.
गावच्या विकासासाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.
गावच्या स्मशानभूमीमध्ये संपूर्ण स्वच्छता करून पाण्याची सोय, वृक्षारोपण व सुंदर बाग निर्माण करून दिव्यांची सोय, रस्ता अशी बरीच कामे केलेले कार्यकर्ते यल्लाप्पा सुळगेकर, भोमानी लाड, सिध्दार्थ चौगुले, उदय चौगुले, सूरज देसाई
यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच वटपौर्णिमेदिवशी वटवृक्षासमोर पूजेसाठी प्रसाद म्हणून ठेवलेली फळे संकलित करून ती अनाथाश्रम व गोरगरिबांना दरवर्षी वाटून अन्न हे संपूर्ण परब्रम्ह आहे त्याची विटंबना होऊ नये हे तत्त्व प्रसार करीत असलेल्या रेणुका लाड, वीणा छप्रे, मालती लाड, रमा बेळगांवकर, प्रियांका धामणेकर, रेखा लाड, शारदा कणबरकर या महिलांचा सत्कार करण्यात आला.
गावातील मुलांसाठी, मर्दानी खेळ, योगासने, व्यायाम व लाठीचे प्रशिक्षण देणारे सचिन चोपडे, साक्षी पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.
शिवतेज युवा संघटनेच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य व एन एम एम एस परीक्षेचे प्रशिक्षण देऊन विद्यार्थी घडवणारे संतोष जैनोजी, विनायक चौगुले, सुशांत चौगुले यांचा सत्कार करण्यात आला.
सुरज भैरू लाड यांनी पाणी टंचाईच्या काळात आपल्या परिसरातील नागरिकांना मोफत पाणीपुरवठा करून त्यांची सोय केली त्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
गावच्या गरीब मुलांसाठी शैक्षणिक मदत करणारे साईनाथ शिरोडकर यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांची, राजनिती, आर्थिक धोरण, गनिमी कावा, समता, बंधुता, न्याय व शिवकालीन इतिहासावर विनायक चौगुले, कृष्णा अनगोळकर, बजरंग धामणेकर, संतोष जैनोजी यांनी विचार मांडले.
सूत्रसंचलन सागर कणबरकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मी व पाटील गल्लीतील शिवभक्त, गावातील युवक व नागरिकांनी परिश्रम घेतले. इतर ग्रामस्थांना आदर्शवत ठरावा असा हा कार्यक्रम पाहून अनेकानी गौरवोद्वार काढले.