बेळगाव : कर्नाटक-गोवा-महाराष्ट्र या राज्यात गुन्हेगारी कृत्ये करून पोलिसांपासून फरार झालेला कुख्यात दरोडेखोर विशालसिंग चौहान याला बेळगाव पोलिसांनी गुंडा ॲक्ट अतंर्गत अटक केली आहे. सध्या त्याची रवानगी गुलबर्गा कारागृहात केली आहे.
एक खून, पाच खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, चोरी, दरोडा, अवैध शस्त्रांचा वापर अशा अनेक गुन्ह्यांमध्ये तो तीन राज्यांच्या पोलिसांना हवा होता.
राउडी विशाल सिंग चौहान (२५) हा मूळचा कित्तूर तालुक्यातील चिक्कनंदीहळ्ळी गावचा असून सध्या तो बेळगाव शहरातील शास्त्री नगर येथे राहत होता.
पोलीस आयुक्त यादा मार्टिन मारबानयांग यांनी खडेबाजार एसीपीच्या शिफारशीवरून आदेश जारी केले आहेत. बेळगावचे डीसीपी रोहन जगदीश यांनी बॉर्डर एस्केप ऑर्डर असताना त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.