Tuesday , December 9 2025
Breaking News

मराठी विद्यानिकेतनचे माजी विद्यार्थी अभिजीत केळकर यांच्याकडून सावित्रीबाई फुले विद्यार्थी दत्तक योजनेला मदत

Spread the love

 

बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव या शाळेचे माजी विद्यार्थी व सध्या पुणे येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर या पदावर कार्यरत असलेले श्री. अभिजीत केळकर यांनी मराठी विद्यानिकेतनच्या सावित्रीबाई फुले विद्यार्थी दत्तक योजनेला 50 हजार रुपयाची देणगी दिली.. अभिजीत केळकर हे सन 2005-06 यावर्षी शाळेचे माजी विद्यार्थी होते. हुषार, अभ्यासू, प्रामाणिक विद्यार्थी अशी त्यांची ओळख होती. त्याचबरोबर ते संगीत विशारद ही होते. सामाजिक भावनेतून दिलेल्या या देणगीबद्दल शाळेची अध्यक्ष श्री. सुभाष ओऊळकर व शाळा प्रशासनाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी अभिजीत केळकर यांचे कुटुंबीय व शाळेच्या शिक्षण संयोजक नीला आपटे, मुख्याध्यापक नारायण उडकेकर, गजानन सावंत व सर्व शिक्षक उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभार सविता पवार यांनी व्यक्त केले.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी २५ हजार शेतकरी उद्या सुवर्णसौधला घेराव घालणार

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात अन्नदात्यांचा संताप अनावर झाला असून, उद्या शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *