बेळगाव : घरातील गरिबी, जबाबदारी यासारख्या अनेक गोष्टींमुळे मुले बालमजुरीमध्ये गुंतलेली असतात. अशा बालकांना सक्तीच्या शिक्षण कायद्याद्वारे संरक्षण व शिक्षण दिले पाहिजे, असे मत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव मुरली मोहन रेड्डी यांनी व्यक्त केले.
बेळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, जिल्हा वकील संघ बेळगाव आणि कामगार विभाग यांच्या वतीने कुमार गंधर्व कला मंदिर येथे जागतिक बालकामगार विरोधी दिन कार्यक्रमाचे आयोजन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.यावेळी बोलताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव मुरली मोहन रेड्डी म्हणाले की, गरिबी, घरातील जबाबदारी अशा अनेक समस्यांमुळे मुले बालमजुरीमध्ये गुंतली आहेत. अशा मुलांना सक्तीच्या शिक्षण कायद्याद्वारे संरक्षण आणि शिक्षण दिले पाहिजे, काही ठिकाणी बालमजुरीचे समर्थन करणारे पालक आहेत, त्यामुळे बेकायदेशीर काम म्हणून बालमजुरीबद्दल अधिक जनजागृती कार्यक्रम व्हायला हवेत. काही हॉटेल्स आणि दुकानांमध्ये कमी किमतीत मजूर मिळावा या उद्देशाने मुलांना कामात गुंतविले जाते. अशा घटना निदर्शनात आल्यास जनतेने त्वरित चाइल्ड हेल्पलाइनवर कॉल करून मुलांचे संरक्षण करण्यास मदत करावी, असे आवाहन मुरली मोहन रेड्डी यांनी केले.
यावेळी मुरली मोहन रेड्डी, कामगार अधिकारी मल्लिकार्जुन जोगुर, नागेश डी. जे. एम. बी अन्सारी, जिल्ह्धिकारी नितेश पाटील आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta