बेळगाव : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त आज महाराष्ट्र एकीकरण समितीचे सीमाभागातील समन्वक प्रा. आनंद आपटेकर यांनी मंगेश चिवटे यांचा शाल, पुष्पगुच्छ व ज्योतिबाची मूर्ती भेटी स्वरूप देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर बेळगावच्या ज्योतिर्लिंग भक्त मंडळ यांच्यावतीने तसेच समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, समिती नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. शुभेच्छांचा स्वीकार करून मंगेश चिवटे म्हणाले की, संपूर्ण सीमाभागातील जनतेचा आशीर्वाद लाभला असून सीमाभागातील प्रश्नावर जातीने लक्ष देऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असेन.
Belgaum Varta Belgaum Varta