बेळगाव : गेल्या तीन महिन्यांपासून बैठकीसाठी दिरंगाई होत असलेली शहर विकास प्राधिकरणाची बैठक जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत अखेर पार पडली असून या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत बोलताना सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव शहराच्या विकासाबाबत चर्चा करून अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या. बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, बुडा आयुक्त शकील अहमद, आमदार राजू सेठ, सचिव लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार अभय पाटील यांच्यासह बुडा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना सतीश जारकीहोळी म्हणाले, कणबर्गी लेआऊटबाबत काही नागरिक न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे बुडा लेआऊट १५ वर्षांपासून रखडले आहे.ते पुढे म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत वनक्षेत्रात नागरी वस्तीला परवानगी देण्यात येणार नाही. बुडामध्ये झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी सरकारी पातळीवर चौकशी करण्यात येत असून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.