बेळगाव : यंदा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या दि. मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला बेळगावचे जॉईंट रजिस्ट्रार डॉ. सुरेशगौडा पाटील आणि त्यांचे सहकारी मुत्ताप्पा गौडप्पणावर यांनी सदिच्छा भेट देऊन सोसायटीच्या कार्याचे कौतुक केले. मर्कंटाइल सोसायटीचे चेअरमन श्री. संजय मोरे यांनी त्यांचे स्वागत केले आणि सोसायटी बद्दलची माहिती दिली.
शाखा व्यवस्थापक विराज भातकांडे यांनी सोसायटीच्या कार्याचा आढावा घेतला. यावर्षी सोसायटीने 68 कोटीच्या ठेवी, 63 कोटीची कर्जे, 23 कोटीची गुंतवणूक करीत 330 कोटीची वार्षिक उलाढाल केली आहे. संस्थेचे भाग भांडवल 1 कोटी 25 लाखाचे असून 11151 सभासद आहेत. संस्थेला गेल्या आर्थिक वर्षात 61 लाख 36 हजार रुपये चा निव्वळ नफा मिळाला आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.
संस्थेने केलेली ही प्रगती पाहून अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आणि याही पुढे अशीच प्रगती करावी असे आवाहन केले. या प्रसंगी संचालक रमेश ओझा, प्रसन्ना रेवनावर, जयपाल ठकाई, सदाशिव कोळी, राजेंद्र अडुरकर, किशोर भोसले, शारदा सावंत, सविता कनबरकर व सर्व शाखा व्यवस्थापक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta