बेळगांव (वार्ता) : आज दि. 11 जानेवारी 2022 रोजी बेळगांव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी महानगरपालिकेच्या 15 व्या वित्तमधून बेळगांवमधील कामत गल्ली, कोनवाळ गल्ली व साई हॉटेलपासून मराठा मंडळ सर्कलपर्यंत अशा विविध भागात ड्रेनेज, सिडी वर्क व कंपाऊंड वॉल निर्माण कामाचे भुमिपूजन करून चालना दिली.
यावेळी बोलताना आमदार अनिल बेनके म्हणाले की, महानगरपालिकेच्या 15 व्या वित्त योजनेमधून शहरातील कामत गल्लीमध्ये रु. 10 लाखातून ड्रेनेज निर्माण, कोनवाळ गल्लीमध्ये रु. 12 लाखातून ड्रेनेज व कंपाऊंड वॉल निर्माण काम व साई हॉटेलपासून मराठा मंडळ सर्कलपर्यंत रु. 18 लाखातून ड्रेनेज व सिडी वर्क निर्माण कामाचे आज भुमिपुजन करुन येथील रहिवाशांची अनेक वर्षापासूनची मागणी पुर्ण केली आहे.
त्यानंतर येथील रहिवाशी म्हणाले की, कंत्राटदारांकडून चांगल्या पद्धतीने कामे होतील याची खात्री करुन घ्यावी तसेच ठराविक वेळेत काम पुर्ण करण्यास अधिकार्यांना सांगावे.
यावेळी आमदारांसमवेत नगरसेवक, महानगरपालिकेचे अधिकारी, एइइ सचिन कांबळे, नरसन्नावर एइ ईश्वर, महादेव मुचंडी, राजु हलगेकर, विपुल जाधव, हणमंत कागलकर, गणेश देडे, भिमराव पात्रोट, भिमशी कागलकर, राहुल बडसकर, सुरेश गाडीवड्डर, कार्यकर्ते व इतर रहिवासी उपस्थित होते.
Check Also
चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड
Spread the love बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री …