बेळगाव (वार्ता) : बेळगाव नगरविकास प्राधिकरणामध्ये १६ वर्षापासून प्रलंबित असलेल्या कणबर्गी गृह प्रकल्पास कॅबिनेट बैठकीत १३७ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, नगरविकास मंत्री सुरेश भैरती यांनी या कामास तात्काळ निधी दिल्याची माहिती बेळगाव नगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी दिली. येथील शासकीय विश्रामधामात शुक्रवारी (ता.२१) सायंकाळीआयोजित बैठकीत ते बोलत होते.
अध्यक्ष चिंगळे म्हणाले, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दोन दिवसांपूर्वी बुडा कार्यालयात बैठक घेऊन लवकरच हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले होते. त्यानंतर कॅबिनेट बैठकीत तात्काळ कणबर्गी गृहप्रकल्पास निधी उपलब्ध करून दिला आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या प्रयत्नाने आमदार राजू शेठ यांचा हा निधी उपलब्ध झाला आहे. हा चांगला उपक्रम असून शासनाने हा निधी मंजूर केल्याबद्दल सर्वांचे आभार मानत असल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta