Sunday , July 26 2026
Breaking News

आदर्श नगर श्रीराम कॉलनीत जागतिक योग दिवस साजरा

Spread the love

 

बेळगाव : आदर्श नगर श्रीराम कॉलनी येथे जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम श्रीराम कॉलनी येथील सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

त्याप्रसंगी डॉ. मृगेंद्र पटृनशेट्टी यांनी आजच्या धावपळीच्या युगात योग अभ्यासाचे महत्व व फायदे याची विस्तृत माहिती दिली. नित्यनेमाने आपल्या आचरणात आणले तर कधीच डॉक्टरकडे जाण्याची गरज भासणार नाही. गेल्या चाळीस वर्षापासून मी अनेक योगसाधक घडवल्याचे आपल्या भाषणात सांगितले. आदर्श नगर परिसरात सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. आदर्श योग वर्गांतील अनेक योगसाधक या प्रसंगी उपस्थित होते. त्यांचा व श्री. गोपालराव मिरजकर यांचा शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *