Friday , December 12 2025
Breaking News

मच्छे गावातील महिलांतर्फे अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी

Spread the love

 

बेळगाव : जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी शुक्रवारी तालुक्याच्या विविध गावांमध्ये सुवासिनी महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली. मात्र मच्छे गावातील काही महिलां दरवर्षी वेगळ्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करत असतात. यावर्षी सुद्धा त्यांनी शुक्रवारी दिवसभर गावातील वेगवेगळ्या ठिकाणी वटपौर्णिमेनिमित्त ठेवण्यात आलेली फळे एकत्र जमा केली, तसेच पूजेसाठी येणाऱ्या महिलांना, वृक्षारोपण व वटवृक्षाचे तसेच पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या या कार्यामुळे व प्रबोधनामुळे बऱ्याच अंशी सकारात्मक बदल महिलांमध्ये घडून येत आहे.
त्यांनी प्रसाद रुपी वटवृक्षासमोर ठेवलेले आंबा, केळी, पेरू, धामण, करवंद, जांभूळ, चिक्कू आधी रानमेव्यासह विविध प्रकारची फळे संकलित केली. तसेच ती फळे संकलित करून मच्छे गाव व परिसरातील भुकेल्या गरजू लोकांना वितरित करण्यात आली.
आपल्या समाजामध्ये बऱ्याच प्रथा परंपरा प्रचलित आहेत.
त्या परंपरा जोपासताना आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अन्न हे संपूर्ण परब्रम्ह समजून, त्याची कोणतीही विटंबना होऊ नये.
ते अन्न गरजूंना उपयोगी व्हावं हा संकल्प आपण सर्वांनी केला पाहिजे, असा संदेश त्यांनी या विधायक कार्यातून दिलेला आहे.
मालती मालोजी लाड, रमा श्याम बेळगावकर, विना गजानन छप्रे, रेखा जयपाल लाड, रूपा वासुदेव लाड, प्रियांका बजरंग धामणेकर, यांनी हा उपक्रम राबविला आहे.
हा उपक्रम राबवण्यासाठी ॲम्बिशन युथ अकॅडमीच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले आहे.

About Belgaum Varta

Check Also

म. ए. युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या शनिवार दिनांक १३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *