बेळगाव : मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरमध्ये आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मोबाईल किंवा इतर गोष्टींकडे लक्ष न देता दररोज योग करण्याकडे अधिक लक्ष दिल्यास विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक शक्ती निर्माण होते यामुळे विद्यार्थी उत्तम प्रकारे अभ्यासाकडे अधिक लक्ष देऊ लागतील. त्याचबरोबर आरोग्य ही उत्तम राहिलं आणि गुणवत्ता वाढीस मदत होईल या विचाराने शाळेमध्ये दर शनिवारी योग हा 1 तास शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. सतिश पाटील हे घेत असतात तसेच आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने मराठी मॉडेल शाळेमध्ये योगासनांचे अनेक प्रकार सादर करण्यात आले. तसेच शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. सतिश पाटील व सौ.एस्. बी. दुरगुडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना योगा बद्दल महत्वाचे मार्गदर्शन केले. यावेळी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक, सर्व एस.डी.एम.सी सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते.