Sunday , April 13 2025
Breaking News

सीमावासीय शिक्षक मंचच्या अध्यक्षपदी दशरथ सुर्यवंशी; नुतन कार्यकारिणी जाहीर

Spread the love

 

बेळगाव : सीमावासीय प्राथमिक शिक्षक मंच, बेळगावच्या अध्यक्षपदी दशरथ सुर्यवंशी व उपाध्यक्षपदी भैरु अकनोजी यांची एकमताने निवड करण्यात आली. संघटनेची नुकताच सर्वसाधारण बैठक झाली व नुतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
कर्नाटकाच्या सीमाभागातील महाराष्ट्र सरकारने दावा केलेल्या ८६५ मराठी बहूसंख्यांक गावातील अनेक शिक्षक महाराष्ट्रातील विविध गावात शिक्षणदानाचे कार्य करीत आहेत. त्यांनी एकत्र येऊन ‘८६५ सीमावासीय प्राथमिक शिक्षक मंच’ नावाची संघटना स्थापन करून शिक्षकांच्या समस्या सोडविण्याबरोबरच मराठी भाषा संवर्धनासाठी कांही उपक्रम हाती घेतले आहेत.
संघटनेची नुकताच सर्वसाधारण बैठक होऊन नवीन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली.
संघटनेची नुतन कार्यकारिणी अशी 
अध्यक्ष-दशरथ सुर्यवंशी, उपाध्यक्ष-भैरु अकनोजी, कार्याध्यक्ष-हणमंत पाटील, सरचिटणीस-दुलाजी कौन्दलकर, चिटणीस-निलेशकुमार सायनेकर, कोषाध्यक्ष-गोपाल चौगुले, प्रसिध्दीप्रमख – मारूती मिलके, विठठल पाटील, संपर्क प्रमुख-कल्लापा एकणेकर, आनिल पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख-परशराम गाडेकर, जिल्हा संघटक प्रमुख- विद्याधर पाटील, महिला संपर्क प्रमुख-मनिषा पेडणेकर, शकुंतला सुतार, महिला संघटक प्रमुख-रेणुका सुतार, प्रसिध्दी प्रमुख -संगीता जळगेकर, रेखा गायकवाड, पर जिल्हा संपर्क प्रमुख-मिनल बर्गे

About Belgaum Varta

Check Also

ध. संभाजीनगर श्री गणेश मंदिर ट्रस्टच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Spread the love  बेळगाव : धर्मवीर संभाजी नगर वडगाव येथील श्री गणेश-मारूती मंदिर ट्रस्ट यांच्यावतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *