बेंगळुरू : पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांनी बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या, राजहंसगड किल्ल्याच्या विकासासाठी ५० लाख रुपये देण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती महिला व बालविकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे.
आज सोमवारी विधानसौध येथे त्यांनी विधी व संसदीय कार्य व पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांची भेट घेतली व राजहंसगड किल्ल्याच्या विकासासाठी दरवर्षी एक कोटी रुपये अनुदान देण्याचे निवेदन मंत्री महोदयांनी दिले. यासंदर्भात माहिती देताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजहंसगड किल्ल्याच्या विकासासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याचे मंत्री पाटील यांनी मान्य केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta