बेळगाव : मान्सूनला सुरुवात झाली असून शहरांमध्ये ठिकठिकाणी चिकनगुनिया आणि डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. हे लक्षात घेता एंजल फाउंडेशनच्या वतीने आज आलारवाड येथील सरकारी प्राथमिक कन्नड शाळेमधून चिकनगुनिया आणि डेंग्यू प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला.
आज सोमवार दिनांक 25 जून 2024 रोजी शाळेतील विद्यार्थ्यांना डेंग्यू आणि चिकनगुनिया प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. फाउंडेशनच्या पदाधिकारी तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधक लस घातली.
याप्रसंगी शाळेचे एस.डी.एम.सी उपाध्यक्ष पद्मश्री बस्तवाड, शाळेचे मुख्याध्यापक पी. के. अर्कशाली, एंजल फाउंडेशनच्या अध्यक्षा मीनाताई बेनके, उपाध्यक्ष दीपक सुतार, सदस्य भारती बडवी, प्रसाद संकन्नावर, रेणुका होसुर, शशिकला जोशी, अँजेलिना डिसोजा, यांच्यासहित शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.