बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये राजर्षी शाहू जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या दीप्ती कुलकर्णी व शहर विभागाच्या पीईओ जहिदा पटेल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता पाचवी ‘अ’तील ईशानी पाटील व आराध्या जाधव या विद्यार्थिनींनी राजर्षी शाहू महाराजांच्या गोष्टी सादर केल्या. संगीत शिक्षक सहदेव कांबळे सर यांनी ‘शाहू फुले तुझी ज्ञानगंगा ‘हे गीत सादर केले. राजर्षी शाहू हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य होते. अशा शब्दात प्रमुख पाहुण्या दीप्ती कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. राजर्षी शाहू महाराज यांची भित्तीपत्रके पाचवी ‘अ’तील विद्यार्थ्यांनी तयार केली. शाळेच्या शिक्षण संयोजकांनी नीला आपटे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, वर्गशिक्षिका प्रतिभा मसूरकर, सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन पाचवी ‘अ’तील विद्यार्थिनी कीर्ती कुबल हिने केले.