Wednesday , March 4 2026
Breaking News

पायोनियर बँकेतर्फे सभासदांना आवाहन

Spread the love

 

बेळगाव : 118 वर्षाची परंपरा असलेल्या येथील दि. पायोनियर अर्बन बँकेतर्फे सभासदांच्या गुणवान विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
गेल्या शैक्षणिक वर्षात ज्या सभासदांच्या पाल्यांनी दहावी, बारावी परीक्षेत 80 टक्के होऊन अधिक गुण मिळवले आहेत. पदवी, पदव्युत्तर परीक्षेत 60% होऊन अधिक गुण मिळवले आहेत, तसेच राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा स्पर्धात चांगले यश संपादन केले आहे. अशा पाल्यांना त्यांच्या गुणांनुक्रमानुसार रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम जुलै महिन्याच्या मध्यास होईल तरी बँकेच्या अ वर्ग सभासदांच्या ज्या पाल्यानी या परीक्षांमध्ये यश संपादन केले आहे त्यांनी आपले मार्कलिस्ट पायोनियर बँकेच्या कलमठ रोड येथील मुख्य कार्यालयात 10 जुलै पूर्वी आणून द्यावेत, असे आवाहन बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *