बेळगाव : कर्नाटकात नवीन सरकार सत्तेत आल्यापासून महिलांना बस प्रवास मोफत केला. पण परिवहन खाते शेतात जाणाऱ्या शेतकरी महिलांना बस थांबवत नसत. आधी पैसे दिले की हवेतिथे उभे करायचे पण आता मात्र दुर्लक्ष होत होते. त्यात शहरी भाग, वडगाव, शहापूर भागातून शेतकरी महिला शहापूर, येळ्ळूर, अनगोळ, धामणे शिवारात शेती असल्याने मोठ्या प्रमाणात महिला बसने प्रवास करत असतात. पण बस प्रवास मोफत झाल्यावर चालक, वाहक स्वतःचेच वाहन आहे या अहंभावात बसमध्ये चढलेल्या शेतकरी महिलाना वडगाव ते थेट येळ्ळूर किंवा धामणे येथेच बस थांबेल अशी तंबी देताच महिला खाली उतरुन खासगी वाहनाने प्रवास करत असत. शहरी भागात हेच वाहक, चालक 100/200 फुटावर बस उभारतात पण शेतकरी महिलावर मात्र जोर दाखवत असत. गेल्या वर्षीपासून महिलांची कुचंबना होत होती. हे ध्यानात घेऊन स्थानिक रयत संघटनेतर्फे परिवहन खाते मुख्य अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून विनंती केल्यावर त्यांनी येळ्ळूर रोडवरील शिवारात बस थांबवण्यात येतील असे आश्वासन दिले. पण मुजोर वाहक, चालकांनी पुन्हा दुर्लक्ष करत बस थांबवत नसत. त्यानंतर पुन्हा परिवहन खाते मुख्य अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत भेट घेऊन आता जर बस थांबत नसतील तर रास्तारोको केला जाईल असा इशाराच दिल्याने. अधिकारी खडबडून जागे होत. येळ्ळूर रोडवर चार ठिकाणी व धामणे रोडवर दोन ठिकाणी बस थांबवून शेतकरी महिलांची सोय केली जाईल असे ठोस आश्वासन देत प्रत्येक ठिकाणी फलक लावण्यासाठी चार फलक पाठवले. ते फलक आज येळ्ळूर रोडवर रयत संघटनेतर्फे उभारण्यात आले. सिध्दिविनायक मंदिर, बायपास, येळ्ळूर, शहापूर शिवार हद्द, पोतदार पेट्रोल पंप येथे आज फलक उभारण्यात आले. यापुढे फलक लावलेल्या ठिकाणी बस थांबवत नसतील तर मोठ्या संखेने शेतकरी महिला, शेतकरी, बैलगाड्यासह येळ्ळूर रास्तारोको केल्याशिवाय रहाणार नाहीत. त्यावेळी मात्र संबंधीत उच्च अधिकारी प्रत्यक्ष आंदोलन ठिकाणी आल्याशिवाय आंदोलन मागे घेतलेच जाणार नाही. हे मात्र नक्की.
फलक उभारण्यासाठी राजू मरवे, हणमंत बाळेकुंद्री, सुरेश मऱ्याक्काचे, अनिल अनगोळकर, गोपाळ सोमनाचे, नितिन पैलवानाचे, भैरु कंग्राळकर, गूंडू भागानाचे, परशराम खन्नूकरसह इतर शेतकऱ्यांनी परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta