बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव इलाईटतर्फे सीए आणि डॉक्टर्स डे दि. १ जुलै रोजी श्रीराम इन्होवेशन्सच्या सभागृहात पार पडला. याप्रसंगी डॉ. अरुणकुमार जमदाडे, डॉ. अभिनंदन हंजी, सीए राजेंद्र बर्वे आणि सीए राजेंद्र मुंदडा यांचा सत्कार करण्यात आला. सुरुवातीला अध्यक्ष सचिन हंगिरगेकर यांनी सर्वांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मानयवरांनी सत्काराला उत्तर देताना आपले मनोगत व्यक्त केले आणि क्लबला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सीए पुष्कर ओगले यांनी केले आणि सचिव श्री. विशाल मुरकुंबी यांनी आभार मानले. या प्रसंगी संस्थेचे सभासद आणि पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta