बेळगाव (वार्ता) : कोरोनाचे नियम पाळून 17 जानेवारी रोजी सकाळी हुतात्मा चौकात हुतात्मा दिन पाळावा अश्या सूचना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केल्या आहेत. शुक्रवारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळाने हिरेमठ यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी उपरोक्त सूचना दिल्या आहेत.
शुक्रवारी दुपारी 3.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांशी 17 जानेवारी हुतात्मा दिनाबाबत चर्चा केली. कोरोनाच्या या काळात आपण सार्यानी अत्यंत सावधगिरी बाळगणे आज आवश्यक आहे. प्रशासनाने अनेक कार्यक्रम साधेपणाने व कमी संख्येत करण्याचा निर्णय घेतला आहे. आपणही अभिवादन कार्यक्रम साधेपणाने व कमी संख्येने पार पाडण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केले. मोर्चा, मिरवणूक, सभा या गोष्टी टाळा, असेही ते म्हणाले.
अभिवादन कार्यक्रम साधेपणाने व शिस्तबद्ध पद्धतीने कोरोनाचे नियम पाळून पार पाडण्यासाठी आम्ही योग्य ते सारे करू असे शिष्टमंडळाने सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अवमान प्रकरणी निषेध करण्यासाठी जमलेल्या युवकांना त्रास देण्यासाठी खोट्या केसीस दाखल करण्यात आल्या आहेत सरकार व प्रशासनाकडे प्रयत्न करून त्यांच्या सुटकेसाठी योग्य ते सारे करा, अशी विनंतीही करण्यात आली. शिष्टमंडळात अध्यक्ष दीपक दळवी, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, चिटणीस रणजित चव्हाण-पाटील व विकास कलघटगी यांचा समावेश होता.
दरम्यान पोलीस आयुक्तांनी देखील महाराष्ट्र एकीकरण समितीला अभिवादन कार्यक्रमासाठी कोविड नियमांचे पालन करून कार्यक्रम करण्यात परवानगी दिली आहे.
Check Also
चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड
Spread the love बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री …