बेंगळुर : लॉकडाऊनमुळे कोरोनावर नियंत्रण आणता येत नाही. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लावण्यात येणार नाही, असे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
बेंगळुरात आज पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर म्हणाले, लॉकडाऊनमुळे कोरोनावर नियंत्रण आणता येत नाही हे सिद्ध झाले आहे. याआधी दोनदा लॉकडाऊन लावल्याने जनतेला मोठा त्रास झाला आहे. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोना संकटातही अर्थचक्र सुरु राहील याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लावण्यात येणार नाही. त्याऐवजी अन्य मार्गांचा अवलंब केला जाईल. लोकांनीही मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे यासह कोरोना मार्गसूचीचे पालन केले पाहिजे. जाहीर कार्यक्रम, गर्दी टाळली पाहिजे. अजून किमान दीड महिना सावधता बाळगली पाहिजे असे मंत्री सुधाकर म्हणाले.
आजपासून सुरु होणार्या विकेंड कर्फ्यूसंदर्भात सुधाकर म्हणाले, या महिन्यात विकेंड कर्फ्यू सुरूच ठेवण्यात येईल. अनेक जिल्ह्यांत संसर्ग वाढत आहे. त्यामुळे विकेंड कर्फ्यू पाळून लोकांनी सहकार्य द्यावे, दुर्लक्ष मुळीच करू नये. राज्यात अद्याप कोरोनाचा उद्रेक झालेला नाही. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तो होईल, पण 3-4 आठवड्यात कमी होईल असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी 5 ते 6% लोकच इस्पितळात दाखल होत आहेत ही दिलासा देणारी बाब आहे. नर्सेसनाही लागण होत आहे. त्यामुळे खबरदारी घेतली पाहिजे. आम्ही दररोज सभा घेऊन आढावा घेत आहोत. संसर्ग अधिक असलेल्या जिल्ह्यांच्या प्रशासनांशी आज सभा घेणार आहोत. पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या सूचना अमलात आणण्यात येतील असे सुधाकर म्हणाले. एकंदर कोरोना नियंत्रणासाठी लोकांनी सहकार्य द्यावे असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी केले.
Check Also
भाजप काळातील घोटाळ्यांच्या चौकशीला गती देणार
Spread the love जी. परमेश्वर; आठवडाभरात मंत्री समितीची बैठक बंगळूर : मागील भाजप सरकारच्या काळात …