खानापूर (वार्ता) : मास्केनट्टी (ता. खानापूर) येथील जोतिबा नागाप्पा भेंडीगीरी सर्वे नंबर ३०, नारायण नागापा लांडे सर्वे नंबर १३३ मधील २ एकरमधील ऊस, विठ्ठल नागापा लांडे सर्वे नंबर १३३ मधील २ एकर ऊस, हणमंत गिड्डापा शिंदोळकर सर्वे नंबर १२८ मधील ४ एकर ऊस, गोविंद लक्ष्मण गुंडूपकर सर्वे नंबर २२ मधील दीड एकर ऊस, शंकर शटवाप्पा गुडपकर, सर्वे नंबर २२/५ मधील २ एकर ऊस, नामदेव लक्ष्मण गुंडूपकर सर्वे नंबर २२/६ मधील २ एकर ऊस, अनिल शटवाप्पा पाटील सर्वे नंबर १६ मधील एक एकर ऊस, अनंत ईश्वर गुंडूपकर सर्वे नंबर १०४ मधील ३ एकर ऊस नागरगाळी जंगलातुन आलेल्या हत्तीनी उभ्या ऊसाचे प्रचंड नुकसान केले आहे.
यावेळी गोल्याळी आरएफओ वनश्री हेगडे, वनपाल अशोक हुली, वन कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी वन अधिकारी वर्गाने उसाच्या नुकसानीची पाहणी केली. जिल्हा वन अधिकारी वर्गाला घटनेची माहिती देण्यात आली असून लवकरात नुकसानग्रस्त शेतकरी वर्गाला नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
Check Also
नंदगड जेसीएस मराठी शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा
Spread the love नंदगड : नंदगड येथील मराठी मुला-मुलींच्या शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात …