बेळगाव : बेळगाव दक्षिण भागातील वडगाव, लक्ष्मी रोड, भारत नगर आणि नाथ पै चौक शहापूर परिसरात ८ दिवसातून एकदा पिण्याचे पाणी सोडण्यात येते. पण ते पाणी इतके गढूळ आहे की पिण्यास अयोग्य आहे. एल अँड टी कंपनीकडे बेळगावच्या पाण्याचे नियोजन दिल्यापासून पाणी पुरवठ्याचे तीन तेरा वाजले आहेत. बेळगावात कावीळ, डेंग्यूचे थैमान माजले असताना महानगर पालिकेकडून करण्यात येणाऱ्या अश्या गढूळ पाणी पुरवठ्यामुळे साथीच्या आजारांना निमंत्रण दिले जात आहे. महानगर पालिकेने आणि आरोग्य विभागाने यावर वेळीच लक्ष द्यावे आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा नागरिकांना करावा नाहीतर नागरिकांनी आंदोलनाचा इशारा महानगरपालिका आणि एल अँड टी कंपनीला दिला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta