बेळगाव : बेळगाव उन्नती ट्रस्टच्या महिला सदस्यांनी पश्चिम बंगालमधील महिला आणि कुटुंबांवरील अत्याचाराविरोधात निदर्शने केली.
बेळगाव उन्नती ट्रस्टच्या महिला सदस्य आणि विविध महिला संघटनांनी पश्चिम बंगालमधील संदेश खली येथे महिला आणि कुटुंबांवरील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी चेन्नम्मा सर्कलमध्ये आंदोलन केले. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन तृणमूल काँग्रेसचे सरकार बरखास्त करण्याचे निवेदन दिले.
यावेळी बोलताना उन्नती ट्रस्टच्या सदस्या म्हणाल्या की, पश्चिम बंगाल राज्यात महिलांवर सातत्याने बलात्कार होत आहेत. पश्चिम बंगालचे तृणमूल काँग्रेस सरकार यावर कोणतीही कारवाई करत नाही, तृणमूल काँग्रेस सरकारचे गृहमंत्री गप्प का, तृणमूल काँग्रेसचे सरकार बरखास्त करावे, असा आक्रोश त्यांनी व्यक्त केला, महिलांची, योग्य सुरक्षा आणि संरक्षण आणि स्वाभिमानासाठी संघर्ष सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनात उन्नती ट्रस्टच्या अध्यक्षा लक्ष्मी मिर्जी, उन्नती ट्रस्टचे सदस्य आणि विविध महिला संघटनांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
Belgaum Varta Belgaum Varta