बेळगाव : टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर देवेंद्र जिंनगौडा स्कूल शिंदोळी आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय मुलांच्या फुटबॉल स्पर्धत संत मीरा अनगोळ, शांतीनिकेतन स्कूल खानापूर यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.
प्राथमिक गटातील अंतिम लढतीत शांतिनिकेतन पब्लिक स्कूल शाळेने संत मीरा अनगोळ शाळेचा पेनाल्टी शुटआऊटवर 5-4 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले विजयी संघाच्या आनंद पाटील, राम आलाहबादी, माज नाईक, ज्ञानेश्वर कुंभार, अखिल पाटील. तर पराभूत संघातर्फे महमंद फरान, रेहान आतार, सुमीत खंबी, रोहन यांनी प्रत्येकी 1 गोल केले.
तर माध्यमिक गटातील अंतिम लढतीत संत मीरा अनगोळ शाळेने शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूरचा पेनाल्टी शुटआऊटवर 5-4 असा अटीतटीच्या लढतीत पराभव करीत विजेतेपद पटकाविले.
विजयी संघाच्या अब्दुल्ला मुल्ला 2 गोल, फैजान धामणेकर, पुथ्वीराज कंग्राळकर, साईराज कुराळेने 1 गोल केला,पराभूत संघातर्फे प्रदिप राठोड 2, ईशांत देवलतर, प्रथमेश यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे अनगोळचे उद्योजक प्रशांत पानारे, पी एस कुरबेट, विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील, स्पर्धा सचिव प्रशांत वाडकर, गणपत गावडे, उदय, ओमकार गावडे, आशा भुजबळ यांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या संघांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी गंगा सानीकोप्प, यश सुतार, शिवकुमार सुतार, श्रद्धा पाटील, पंच आदित्य सानी, स्वयंम ताशीलदार, प्रणव देसाई, स्वरूप हलगेकर सिद्धार्थ वर्मा, अभिषेक गिरीगौडर, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत वाडकर तर उदय यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta