Wednesday , March 4 2026
Breaking News

ड्रीम इंडिया कंपनीचे बेळगावात उद्घाटन

Spread the love

 

बेळगाव : ड्रीम इंडिया कंपनी बांधकाम व कर्ज वितरण क्षेत्रामध्ये काम करीत आहे. या कंपनीच्या बेळगाव शाखेचे उद्घाटन हिंदवाडी येथे करण्यात आले. याप्रसंगी बोलताना मनोहर कालकुंद्रीकर यांनी ड्रीम इंडिया कंपनीच्या विविध कर्ज योजनांची माहिती उपस्थितांना दिली. लोकांना आवश्यक असलेली कर्जे मिळताना अनेक अडचणींचा त्रास होतो. मात्र या कंपनीद्वारे कोणत्याही प्रकारचे कर्ज कर्जदाराला वेळेवर मिळू शकते. यासाठी कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त भार लावला जात नाही. राष्ट्रीय पातळीवर आरबीआयने ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच विविध बँकांच्या माध्यमातून ही कंपनी कर्ज वितरण करीत असते. ही कंपनी वैयक्तिक कर्ज, घर कर्ज, प्लॉट खरेदी कर्ज, बिजनेस कर्ज, तारण कर्ज, घर बांधणीसाठी कर्ज, घर दुरुस्तीसाठी कर्ज, इत्यादी सर्व प्रकारची कर्जे कर्जदारांना लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असते. आजवर या कंपनीच्या माध्यमातून अनेकांना कर्ज मिळवून दिलेली आहेत असेही श्री. मनोहर कालकुंद्रीकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी कंपनीचे एक्झिक्यूटिव्ह संताजी संभाजी, श्रीयुत संत्री, माजी नगरसेविका जयश्री माळगी. त्रिवेणी पट्टेद, सुभाष पवार आणि कर्मचारी तसेच बेळगाव वार्ता न्यूज चॅनेलचे प्रमुख सुहास हुद्दार, स्वतंत्र प्रगतीचे संपादक राजेंद्र पोवार, शेखर पाटील, उमेश पाटील आणि इतर उपस्थित होते. यावेळी बेळगाव जिल्हा ड्रीम इंडिया कार्यालयास अनेकांनी शुभेच्छा देऊन कर्जदारांसाठी उत्तम सोय केल्याबद्दल धन्यवाद दिले.
ड्रीम इंडिया कंपनीचे हे कार्यालय महावीर भवन जवळील महावीर गार्डन समोर हिंदवाडी येथे सुरू करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *