बेळगाव : दरवर्षीप्रमाणे येथील कंग्राळ गल्ली शेतकरी संघ, कंग्राळ गल्ली पंच मंडळ, नागरिक आणि बेळगाव देवस्थान मंडळ यांच्या वतीने हनुमान नगर येथे धुपटेश्वर (गौळदेव) पूजा मोठ्या उत्साहात पार पडली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बेळगावच्या महापौर सौ. सरिता कांबळे, उपमहापौर श्री. आनंद चव्हाण, माजी आमदार श्री. अनिल बेनके, नगरसेवक श्री. शंकर पाटील, नगरसेविका विना विजापुरे उपस्थित होत्या. प्रारंभी बेळगाव देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. रणजीत चव्हाण पाटील यांनी देवासमोर गाऱ्हाणे घातले. बेळगाव गावात आणि परिसरात खूप पाऊस होऊन शेतकऱ्यांच्या शेतात पिके डोलू देत नागरिकांना पिण्यासाठी भरपूर पाणी मिळू दे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यानंतर परंपरेप्रमाणे बैल पळवून भाताचे गोळे मारण्यात आले. यावेळी महापौर कांबळे यांचा सन्मान शोभा मोरे तर उपमहापौर आनंद चव्हाण यांचा सन्मान नगरसेवक शंकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी आमदार अनिल बेनके, नगरसेविका विना विजापुरे, रणजीत पाटील, प्राचार्य आनंद आपटेकर, श्री. अनंतराव पाटील, प्राचार्य सुधीर एन. पाटील यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. समारंभात माजी महापौर श्री. मालोजी अष्टेकर, श्री. शंकर बडवानाचे, श्री. अशोक कंग्राळकर, श्री. बाबुराव कुट्रे, श्री. दौलत मोरे, श्री. रमेश मोरे, श्री. दुर्गेश मैत्री, श्री. शरद पाटील, प्रकाश पाटील, नारायण चौगुले, लक्ष्मण किल्लेकर, सागर मुतकेकर व कंग्राळ गल्लीतील युवा कार्यकर्ते व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.