बेळगाव : मराठा सेवा संघाच्यावतीने कोल्हापूरचे विनोद कुराडे यांचे माईंड पॉवर सेमिनार पार पडले. वडगाव येथील मराठा सभागृहात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ आणि शिवप्रतिमा पूजनाने तसेच दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आर. के. पाटील, कमलेश मोरया, नारायण सांगावकर, मनोहर घाडी आदी उपस्थित होते. शिवाजी जाधव यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. यानंतर किरण धामणेकर यांनी प्रास्ताविकात मराठा समाज सेवा संघाच्या कार्याची माहिती दिली.
माईंड ट्रेनर आणि मोटिवेशनल स्पिकर विनोद कुराडे यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, एकाग्रता व स्मरणशक्ती कशी वाढवावी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी विनोद कुराडे, सातेरी विद्यालयाचे शिक्षक आर. के. पाटील, वारानासी येथील कमलेश मौरया, नागेश कालींग, श्रेयश रमेश पाटील, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर रमेश धामणेकर आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आनंद काटकर, पंकज सातवणेकर, भरतेश पाटील, भारत काकडे, संदिप घाडी, जगदिश शट्टीबाचे, विशाल मुतकेकर आदींसह मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि मराठा समाज बांधव उपस्थित होते. सचिव मनोहर घाडी यांनी सुत्रसंचलन तर उपाध्यक्ष नारायण सांगावकर यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta