बेळगाव : जायंटस ग्रुप मेनच्या वतीने कपिलेश्वर मंदिर परिसरात डेंग्यू प्रतिबंधक लस वितरण करण्यात आली. बेळगाव जिल्ह्यात वाढते डेंग्यूबाधित रूग्ण पाहून जायंटस् ग्रुप मेनच्या वतीने लसीकरण शिबीर आयोजित कारण्यात आले. या शिबीरात कपिलेश्वर परिसरातील नागरीक मंदिराला येणाऱ्या भक्तासह 500 हुन अधिक जणांना याचा लाभ झाला. जायंटस अध्यक्ष अविनाश पाटील, सचिव यल्लाप्पा पाटील, सुनील मुतगेकर, अनील चौगुले, अशोक हलगेकर, अरूण काळे, दिगंबर किल्लेकर, पदमप्रसाद हुली, आनंद कुलकर्णी, ईश्वर पाटील, विनोद आंबेवाडीकर आदी सदस्य उपास्थित होते. या कार्यक्रमाला शिवकुमार हिरेमठ यांचे सहकार्य लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta