बेळगाव : ६ व ७ जुलै रोजी गदग येथे पार पडलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय खुल्या कराटे स्पर्धेत श्री चांगळेश्वरी लोअर प्रायमरी स्कूल, येळ्ळूरची विद्यार्थिनी सानवी अमित बेडरे हिने सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेत १००० हून अधिक कराटेपटूनी सहभाग घेतला होता.
तिच्या या यशाबद्दल तिचे प्रशिक्षक चंदन जोशी, नागराज जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. चांगळेश्वरी हायस्कूलमध्ये दररोज संध्याकाळी पाच ते सहा वाजता चालणाऱ्या कराटे प्रशिक्षणाचा तिने लाभ घेतला. याबद्दल तिचा शाळेत मुख्याध्यापक व शिक्षक वर्गाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
शाळेमध्ये सध्या सुरू असलेल्या कराटे प्रशिक्षणाचा लाभ येळ्ळूरच्या विद्यार्थ्यांनी घेऊन गावचे नाव उज्वल करावे असे उद्गार यावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक ए. डी. धामणेकर यांनी काढले. यावेळी प्रायमरी विभागाचे मुख्याध्यापक आय. बी. राऊत सर आणि सर्व शिक्षक व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta