बेळगाव : कुडलसंगम गुरुपीठाचे श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली आज महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निवासस्थानी पंचमसाली समाजाच्या 2अ आरक्षणासाठी पावसाळी अधिवेशनात आवाज उठविण्याच्या मागणीसाठी मागणी पत्र आंदोलन करण्यात आले.
पावसाळी अधिवेशनात पंचमसाली समाजाला 2अ आरक्षण देण्यासाठी समाजाच्या मंत्री व आमदारांना आवाज उठवण्यास भाग पाडणे हा या लढ्याचा एक भाग आहे. महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निवासस्थानी आज कुडलसंगम गुरुपीठाचे श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली पंचमसाली पत्र आंदोलन करण्यात आले.
यावेळी कुडलसंगम गुरुपीठाचे श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना मागणी पत्र देऊन 2अ आरक्षणासाठी पावसाळी अधिवेशनात आवाज उठविण्याचे आवाहन केले. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे संपूर्ण कुटुंब सुरुवातीपासूनच पंचमसाली संघर्षात सक्रिय आहे. गेल्या वेळी सभापतींचे लक्ष वेधून आरक्षणासाठी चर्चेची संधी देण्यात आली होती. पण काही कारणांमुळे हा लढा यशस्वी होऊ शकला नाही. यावेळीही समाजातील 28 आमदारांनी आवाज उठविल्यास पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा नक्कीच उपस्थित होईल, असे स्वामीजी म्हणाले.
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, हा संघर्ष अंतिम टप्प्यात पोहोचण्याची चिन्हे आहेत. समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. समाजाची मुलगी म्हणून आरक्षणाबाबत सभागृहाचे लक्ष वेधेंन आणि अधिवेशनात यावर चर्चा करू, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी आमदार चन्नराज हट्टीहोळी, मृणाल हेब्बाळकर, आर. के. पाटील, अल्लमप्रभू, बसवराज पाटील, शिवानंद तंबाकी नंदू कारजोळ, बसवराज पाटील, सिद्धानगौडा पाटील, आनंद गुडस, रावसाव पाटील, राजू मगदुम्म, बसवराज कोट्टूरशेट्टी, सुरेश अप्परशेट्टी, शिवाप्पा सवदी आनंद गुडस यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.