
बेळगाव : रोटरी इ क्लबचा गोगटे कॉलेजच्या वेणूगोपाल सभागृहात पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. रो. लक्ष्मी पावन मुतालिक यांची 2024-25 सालासाठी रोटरी इ क्लबच्या अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर रोटरीचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. अविनाश पोतदार, माजी अध्यक्षा रो. ज्योती मठद, माजी सचिव रो. आशुतोष डेव्हिड, नवनिर्वाचित अध्यक्षा रो. लक्ष्मी मुतालिक, सचिव रो. सागर वाघमारे, गव्हर्नरचे सहाय्यक रो. ऍड. सचिन बिच्चू व या कार्यक्रमाच्या व्यवस्थापिका रो. डॉ. राजश्री कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी माजी सचिव आशुतोष डेव्हिड यांनी वर्षभरात केलेल्या प्रकलपांचे सादरीकरण केले. माजी अध्यक्षा ज्योती मठद यांनी 5 गरीब मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती जाहीर केली. मरिअम्मा टीचर संचालित किआन, नंदन मक्कळ धाम, करुणालय होम फॉर डेस्टिटयूट्स यांना प्रत्येकी १५ किलो तेलाचा डबा आणि ५ किलो शेंगदाणे देण्यात आले. तेल आणि शेंगदाणे खेडूत फूड्स आणि फीड्स, गोंदल, गुजरातचे एमडी तुषार थुम्मर यांनी प्रायोजित केले होते.
त्यानंतर माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. अविनाश पोतदार यांच्या हस्ते रो. लक्ष्मी मुतालिक यांना अध्यक्ष पदाचा भार सोपविण्यात आला. रो. लक्ष्मी मुतालिक यांनी आपल्या नवीन बोर्ड सदस्यांची नावे जाहीर केली.
रो. अविनाश पोतदार यांनी त्यांच्या भाषणात क्लबने केलेल्या प्रकलपांचे कौतुक करून क्लबने आजपर्यंत उभारलेल्या निधीबद्दल अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. लता कित्तूर यांनी केले. रो. डॉ. राजश्री याच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी रोटरी इ क्लबचे व बेळगावातील इतर रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta