बेळगाव : राष्ट्रीय महामार्गला लागून असलेला आणि केंद्रीय बसस्थानकाकडे जाणारा हा रस्ता जणू मृत्यूचा सापळा बनला आहे.
दोन्ही बाजूने असणारी गटारे त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. खड्डे इतके मोठे आहेत की दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. विमानतळ अवघ्या 12 कि.मी. अंतरावर आहे. त्यामुळे हा रस्ता महत्वाचा आहे. खड्यांमुळे काही वाहनधारक चुकीच्या बाजूने गाड्या चालवत आहेत त्यामुळे याचा नाहक त्रास दुसऱ्या बाजूने येणाऱ्या वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. पावसाळा संपेपर्यंत तात्पुरती डागडुजी जर इथे झाली नाही तर अपघाताची स्थिती नाकारता येणार नाही. म्हणून महानगरपालिका तसेच लोकप्रतिनिधींनी या रस्त्याकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे.
Belgaum Varta Belgaum Varta