बेळगाव : सरकारी आदर्श मराठी प्राथमिक शाळा काकती बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे शनिवार दिनांक १३/७/२०२४ रोजी इयत्ता पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांना शालोपयोगी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीताने केली. शाळेचे मुख्याध्यापक किरण करंबळकर यांनी प्रास्ताविक केले. युवा समितीच्या कार्याचे कौतुक करीत पालकांनी विद्यार्थ्यांना मराठी शाळेत पाठविणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. युवा समिती सहकारी आशिष कोचेरी यांनी युवा समितीच्या उपक्रमाची माहिती दिली आणि पालकांनी आपल्या पाल्यांसाठी मराठी माध्यम निवडले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. मराठी माध्यमातूनही फार मोठे यश गाठता येते, मातृभाषेतून शिक्षण काळाची गरज असून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास मातृभाषेतून होतो असे विचार आपल्या भाषणातून व्यक्त केले. समाजसेवक गणपत सुरेकर यांनी युवा समितीच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे सहकारी विनायक केसरकर, शाळेचे मुख्याध्यापक किरण करंबळकर, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष अनिल गवी, शिक्षक वर्ग कर्मचारी वर्ग विद्यार्थी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी घोडके यांनी केले तर आभार प्रदर्शन एस. जी. कित्तुर यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta