Tuesday , March 3 2026
Breaking News

कबड्डी स्पर्धेत शांतिनिकेतन पब्लिक स्कूलला दुहेरी मुकुट

Spread the love

 

बेळगाव : शिंदोळी येथील देवेंद्र जीनगौडा स्कूल आयोजित विद्याभारती बेळगाव जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत खानापूरच्या शांतिनिकेतन पब्लिक स्कूल शाळेने दुहेरी मुकुट तर हनीवेल स्कूल व देवेंद्र जीनगौडा शाळेने ही विजेतेपद पटकाविले.
देवेंद्र जीनगौडा शाळेच्या मैदानावर घेण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेतील प्राथमिक मुलांच्या अंतिम लढतीत शांतिनिकेतन पब्लिक स्कूल शाळेने देवेंद्र जीनगौडा शाळेचा 3 गुणांनी पराभव करीत विजेतेपद पटकाविले, तर मुलींच्या गटातील अंतिम लढतील देवेंद्र जीनगौडा स्कूलने शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचा 6 गुणांनी पराभव करीत विजेतेपद पटकाविले, तर माध्यमिक मुलांच्या गटातील अंतिम लढतीत शांतिनिकेतन पब्लिक स्कूलने देवेंद्र जीनगौडा स्कूलचा 4 गुणांनी पराभव करीत विजेतेपद पटकाविले तर मुलींच्या गटातील अंतिम लढतीत हनिवेल इंग्लिश मीडियम स्कूलने शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचा 6 गुणांनी पराभव करीत या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले वरील विजेते संघ आगामी होणाऱ्या विद्याभारती राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील, स्पर्धा सचिव प्रशांत वाडकर, उदय संकण्णावर या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या, उपविजेत्या संघांना चषक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून गंगा सानीकोप्प, मयुरी पिंगट, यश पाटील, शिवकुमार सुतार, उमेश पट्टेद, नारायण गावडे, सागर कोलेकर यांनी काम पाहिले.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *