Wednesday , March 4 2026
Breaking News

विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा १८ जुलै रोजी २४ वा पदवीदान समारंभ

Spread the love

 

बेळगाव : विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा 24 वा दीक्षांत समारंभ 18 जुलै रोजी आयोजिण्यात आला आहे, अशी माहिती व्हीटीयूचे कुलपती डॉ. एस विद्याशंकर यांनी दिली.

बेळगावमध्ये बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहिती दिली. गुरुवार दि. 18 जुलै रोजी विश्वेश्वरय्या विश्वविद्यालय ज्ञान संगम प्रांगणातील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहात 24 वा वार्षिक दीक्षांत समारंभ होणार आहे. उच्च शिक्षण मंत्री डॉ. एम. सी. सुधाकर, भारतीय विज्ञान मंदिराचे संचालक गोविंदन रंगराजन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी तीन मान्यवरांचा डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देऊन सन्मान होणार आहे तर 340 संशोधन पदव्या, 10 हून अधिक विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला प्रा. टी. एन. श्रीनिवास यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक आणि विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *