Saturday , March 7 2026
Breaking News

कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Spread the love

 

बेळगाव (वार्ता) : कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नूतन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची बेळगाव येथे भेट घेतली. यावेळी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार, अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. शिवाय शेतकऱ्यांच्या विविध समस्या बाबतचे निवेदन सादर केले.
राजू पोवार यांनी, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कर्नाटक राज्य रयत संघटना नेहमीच कार्यरत आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, महापूर काळात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही. शिवाय सर्वसामान्य शेतकऱ्यांची घरे जमीन दोस्त झाले असून अद्याप त्यांना आसरा मिळालेले नाही. यासह विविध समस्या आहेत. त्यांचे तात्काळ निवारण करावे. आतापर्यंत सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी सहकार्याची भूमिका घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. या पुढील काळातही नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी रयत संघटनेच्या पाठीशी राहून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आवाहन केले.
जिल्हाधिकारी रोशन यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून देशात अन्नधान्य पुरवणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्यांची आपल्याला जाणीव आहे. त्यामुळे त्यांच्या समस्या सोडण्यासाठी आपण प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी प्रकाश नाईक, किसन नंदी, वासू पंढरोळी, संजू हबनावर, बाबासाहेब पाटील, सागर पाटील, चिनु कुळवमोडे, सर्जेराव हेगडे, शिवाजी वाडेकर, बबन जामदार, एकनाथ सादरकर यांच्यासह कर्नाटक राज्य रयत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

रयत गल्ली विहिरीत ड्रेनेज मिश्रित पाणी; जनतेचे आरोग्य धोक्यात

Spread the love  बेळगाव : ड्रेनेजचे सांडपाणी जमिनीत झिरपून रयत गल्ली, वडगाव येथील विहिरी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *