बेळगाव : रुबेलाचे इंजेक्शन दिल्यानंतर तिघा बाळांचा मृत्यू झाल्याची घटना बेळगावात घडली आहे. रामदुर्ग तालुक्यातील बोचबाळ गावातील पवित्र हुलगुर (13 महिने), मधु उमेश कुरगुंडी (14 महिने) आणि चेतन पुजारी (15 महिने) यांचा मृत्यू झालायं. तीन दिवसांपूर्वी चौघा बाळांना बिम्समध्ये दाखल करण्यात आले होते. पण आता तिघांचा मृत्यू झाला आहे.
बालकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण व्हावी, यासाठी रुबेला ही लस देण्यात येते. रामदुर्ग तालुक्यातील सालहळ्ळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्यांकडून एकूण 17 बालकांना रुबेला लस देण्यात आली होती. त्यानंतर चार मुले आजारी पडली होती आणि नंतर तिघांचा मृत्यू झाला. अन्य एका मुलाची प्रकृती गंभीर असून, मृत्यूशी झुंज सुरू असल्याचे समजते. बेळगाव जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृत्यूचे कारण समजणार आहे. तीन लहान मुलांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. काल शनिवारी (15 जानेवारी) एका बालकाचा मृत्यू झाला होता. आज पुन्हा दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. बिम्स हॉस्पिटलमध्ये सध्या शवविच्छेदन सुरू आहे. या मुलांना रुबेला लस देण्यात आली. 12 जुलै रोजी आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनी रुबेला लस दिली. इंजेक्शन दिल्यानंतर उलट्या जुलाब सुरू झाले. ताबडतोब मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांच्या बेजबाबदारपणामुळे मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असून शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. रामदूर्ग तालुक्यातील कुलगौड पोलिस मुलांच्या मृत्यूचा तपास करत आहेत.
Check Also
पंचमसाली आरक्षणासाठी १८ रोजी ‘चलो बेंगळुरू’ची हाक : बसवजय मृत्युंजय स्वामी
Spread the love बेळगाव : गेल्या वर्षभरापासून पंचमसाली समाजाचे २ए आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरु …