Tuesday , April 23 2024
Breaking News

इयत्ता 1 ते 9 वीच्या शाळा उद्यापासून पुन्हा सुरू

Spread the love

बेळगाव (वार्ता) : 11 जानेवारी ते 18 जानेवारी या कालावधीत इयत्ता 1 ते 9 वीच्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले होते. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आढावा घेऊन या आदेशात बदल करण्यात आला आणि इयत्ता 1 ते 9 वी साठी सोमवार 17 जानेवारीपासून शाळा पुन्हा सुरू होणार आहेत.
अथणी येथे शनिवारी 100 हून अधिक मुलांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आढळल्याने बेळगाव जिल्ह्यातील पालक आणि अधिकारी चिंतेत आहेत. बहुतेक मुले ग्रामीण भागातील आहेत आणि त्यांना सौम्य लक्षणे आढळली आहेत.
यक्कुंडी गावातील सरकारी हायस्कूलमधील 15 विद्यार्थी आणि एका शिक्षकाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अथणीच्या हद्दीतील बनजवाड एज्युकेशन सोसायटी निवासी प्राथमिक, इंटरमिजिएट आणि प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये 62 विद्यार्थी पॉझिटिव्ह आले आहेत.
हल्याळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील दोन, उगार प्राथमिक आरोग्य केंद्रात सात, शिवनूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत तीन आणि अनंतपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील 10 विद्यार्थ्यांना विषाणूची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर 31 जानेवारी पर्यंत शाळा केल्या जाऊ नये अशी मागणी करण्यात आली होती.
बेळगावच्या सिटीझन फोरम या संस्थेनेही यासंदर्भातील मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली व शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी विनंती करण्यात आली मात्र तरीही उद्या पासून शाळा सुरू होणार आहेत.
विद्यार्थ्यांनी या नियमांचे पालन करावे
नेहमी मास्क घाला, पिण्याचे पाणी गरम आणि घरातून घ्या, शाळेत सॅनिटायझरची बाटली घेऊन जा, एखाद्या शाळेतील पॉझिटिव्हची संख्या 10% पेक्षा जास्त असल्याच त्या शाळा बंद केल्या जातील.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात 13 उमेदवार

Spread the love  बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघात अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी 13 जण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *