Wednesday , March 4 2026
Breaking News

शांताई वृद्धाश्रम व उषाताई गोगटे शाळेत डेंग्यू लसीकरण

Spread the love

 

बेळगाव : बेळगावच्या शांताई वृद्धाश्रम आणि उषाताई गोगटे शाळेत डेंग्यू लसीकरण करण्यात आले.
भरतेश वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी आणि माजी महापौर विजय मोरे यांच्या पुढाकारातून डेंग्यू जनजागृती व लसीकरण करण्यात आले. शांताई वृद्धाश्रमातील सदस्य व कर्मचाऱ्यांना डेंग्यू प्रतिबंधक लसीचे वाटप केले. तसेच उषाताई गोगटे शाळेत आयोजित डेंग्यू लसीकरण शिबिराचा सुमारे 500 विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. यावेळी माजी महापौर विजय मोरे यांनी डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व जनजागृतीची माहिती दिली. प्राचार्या नयना, ॲलन मोरे आणि भरतेश मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी देखील डेंग्यूबाबत जनजागृती केली. आपल्या परिसराची स्वच्छता राखली पाहिजे. डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी खबरदारी घेऊन उपाययोजना आखणे गरजेचे आहे असे सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *