बेळगाव : गेल्या आठवडाभरापासून पश्चिम घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव तालुक्यातील राकसकोप जलाशय पूर्ण क्षमतेने भरणार असल्याने बेळगावनगरीतील नागरिकांना समाधान होत आहे.
बेळगाव शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत असलेले राकसकोप जलाशय लवकरच भरणार आहे. 0.60 टीएमसी क्षमतेच्या जलाशयाची एकूण उंची 2475 फूट आहे. आजची पाण्याची पातळी 2471.4 फूट आहे. आणखी चार फूट पाणी आल्यास जलाशय भरेल.
पाऊस असाच सुरू राहिल्यास येत्या दोन दिवसांत जलाशय पूर्ण क्षमतेने भरेल, राकसकोप जलाशय भरणार असून या पार्श्वभूमीवर पाणी सोडण्याचा विचार करण्यात आला असून जलाशयाचे पाणी मार्कंडेय नदीत सोडले तर मार्कंडेय नदी काठच्या लोकांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मार्कंडेय नदीच्या काठावरील बेळगाव शहरातील हजारो हेक्टर जमिनीत पाणी शिरण्याची भीती आहे.