Wednesday , March 4 2026
Breaking News

मार्कंडेय नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. राकसकोप धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास केवळ 2 फूट पाण्याची गरज आहे. त्यामुळे राकसकोप धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. जलाशयातील अतिरिक्त पाणी धरणातून सोडण्यात आल्यामुळे पाण्याचा विसर्ग झाला आहे. त्यामुळे राकसकोप धरणाच्या बाजूस मार्कंडेय नदी नाल्याच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा पाणीपुरवठा मंडळाने दिला आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *