येळ्ळूर : अलिकडच्या काळात सहकार चळवळ अधिक मजबूत आणि सशक्त बनविण्यासाठी केंद्र सरकारचे सहकार खाते आणि राष्ट्रीय को – ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इडिया (NCUI) या संस्था प्रयत्नशिल आहेत. याचाच एक भाग म्हणून दि. 8 जुलै ते 10 जुलै 2024 पर्यंत मल्टीस्टेट संस्थांच्या चेअरमन आणि संचालकांना लिडर्शिप डेव्हलमेंट ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमामध्ये नवहिंद संस्थेचे चेअरमन प्रकाश अष्टेकर, व्हा. चेअरमन अनिल हुंदरे, संचालक प्रदिप मुरकुटे, सी. बी. पाटील, शिवाजी सायनेकर, संभाजी कणबरकर, श्रीधर धामणेकर यांनी भाग घेतला होता.
तीन दिवसाच्या या कार्यशाळेत को ऑप. क्रेडीट सोसायटीच्या कामकाजाबद्दल उपयुक्त माहिती देण्यात आली. ट्रेनिंग प्रमुख दिप्ती यादव, डेप्युअटी डायरेक्टर (NCUI) यांनी सर्वांचे स्वागत करुन कार्यशाळेचा उद्देश सांगितला. सहकार क्षेत्रातील वेगवेगळ्या तज्ञांनी वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केले. त्यामध्ये श्री. अनंत दुबे यांनी सहकार तत्वज्ञान, मुल्ये व सिध्दांत आणी सोशल मिडीया यावर मार्गदर्शन केले. श्री. व्ही. के. दुबे यांनी संस्थेचे सभासद होणे, ते रद्द करणे तसेच चेअरमन व संचालक मंडळाची कर्त्यव्ये व जबाबदारी यावर मार्गदर्शन केले. श्री. अनुराग यांनी आर्थिक नियोजन, जी. एस. टी व इतर टॅक्सचा को ऑपरेटिव्ह सोसायटीवर होणारा पारिणाम यावर मार्गदर्शन केले. श्री यशांक कल्याणी यांनी बायलॉज आणि अमेंडमेंट यावर माहिती दिली. डॉ. राधिका महाजन यांनी प्रोजेक्ट प्लॅनिंगबद्दल पीपीटी दाखवून माहिती दिली. प्राचार्य एस. सी. प्रधान यांनी आय. टी. या नविन तंत्रज्ञानाचा आपल्या संस्थेमध्ये प्रभावी उपयोग कसा करुन घ्यावा या बद्दल माहिती दिली. संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुका कशा व कधी घ्याव्यात त्यासाठी कोणते आधिकारी नेमले जातात, निवडणुकीला येणार खर्च याबद्दल सुध्दा मार्गदर्शन करण्यात आले. ट्रेनिंगच्या दरमान्य IFFCO या वर्षाला 60,000 कोटी रुपये उलाढाल करणाऱ्या खत कंपनीला भेट देवून तेथील कामकाजाची माहिती जाणून घेण्यात आली ट्रेनिंगमध्ये राहण्याची, जेवणाची, उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. कार्यशाळेच्या माध्यमातून आम्हाला सहकारातून समृध्दी कशी प्राप्त करावयाची याची उत्तम माहिती मिळाल्याची भावना आणि विचार चेअरमन प्रकाश अष्टेकर यांनी समारोह कार्यक्रमात मांडले.
सदर कार्यशाळेत महाराष्ट्र, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, आसाम, केरळ, तामिळनाडू, नागालँड, अरुणाचल प्रदेश, हरियाणा या राज्यातील मल्टीस्टेट सोसायटीचे 75 प्रतिनिधी सहभागी झाले होते